नगरपालिकेत सामाजिक कार्यकर्त्यांने घेतले पेटवून

The fire was taken by social workers in the municipality

कोल्हापूर : इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे (Naresh Bhore) यांनी घंटागाडी चालकाकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी नगरपालिकेच्या दरात पेटवून घेतले. ते भाजून गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. या घटनेने पोलीस आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली आहे.

गेल्या आठवड्यात शहापूर रस्त्यावरुन मेलेले डुकर घंटागाडीतून नेण्याऐवजी चक्क घंटागाडीला बांधून रस्त्यावरुन ओढून नेले जात होते. हा प्रकार नरेश भोरे यांच्या निदर्शनास आला. त्यानी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन, गाडीला मृत डुकर बांधून ओढत नेण्यास घंटागाडी चालकास अटकाव केला. त्यावरुन संबंधीत गाडीच्या चालकाने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती. तसेच त्याच्यावर दहशत निर्माण करुन भोरे यांना चक्क मेलेले डुकर उचलून घंटागाडीत टाकण्यास भाग पाडले होते.

याप्रकरणी कचरा उठाव करणाऱ्या संबंधीत ठेकेदार व ठेका घेतलेल्या कंपनीतर पेटा कायदानुसार कारवाई करण्याची मागणी केली होती.

याप्रकरणी कचरा उठाव करणाऱ्या संबंधीत ठेकेदार व ठेका घेतलेल्या कंपनीवर पेटा अॅनिमल कायद्यातंर्गत कारवाईस नगरपालिका टाळाटाळ करत होती. शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या संबंधीत घंटागाडीच्या चालकावर कारवाई झाली नाही. या मागणीसाठी त्यांनी आज नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार भोरे यांनी पेट्रोलची बाटली घेवून नगरपालिकेच्या इमारतीत प्रवेश केला. प्रवेश करताच त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले. या प्रकाराने नगरपालिका आणि पोलिसांमध्ये एकच धावपळ उडाली. त्यांच्या अंगाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला पण यात ते भाजून गंभीर झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER