भंडारा जिला रुग्णालयातील नवजात बालकांच्या वार्डात आगीने 10 नवजात दगावले

Bhandara Government District Hospital

भंडारा :- जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास दोन वाजेला 2:00 ही आग लागली असून सतरा बालकांपैकी 7 लोकांना वाचविण्यात यश आलेला आहे.

शनिवारी रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्ण युनिट मधून धूर निघत असल्याचे समोर आले ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या रूम मध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निषमक दल घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNCU मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत यापैकी मॉनिटर मध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले तर औट बॉल युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला.

अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आलं. रुग्णालयातील लोकांनीही यावेळी मदतकार्यात सहकार्य केलं. दरम्यान, शिशु केअर विभागातील मॉनिटर असलेले 7 बालकांना वाचवण्यात यश आलं असलं तरी आऊट बॉर्न विभागातील 10 बाळांचा मात्र मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सकांसह अनेक अधिकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसंच संपूर्ण रुग्णालयाला पोलिसांनी वेढा घातला आहे. आरोग्य उपसंचालक संजय जयस्वालही भंडाऱ्यात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी म्हटलंय. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन अन्य रुग्णांना दुसरीकडे हलवण्याचे आणि लागेल ती मदत पुरवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच त्यांनी चौकशीचे आदेशही देण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER