चित्रपटात दिसेल केंद्रीय मंत्री निशंक यांची मुलगी, तापसी आणि भूमी सह करणार स्क्रीन शेअर

Arushi Nishank

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhriyal Nishank) यांची मुलगी आरुषि निशंक लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या काही निकटवर्तीयांनी या माहितीची पुष्टी केली आणि सांगितले की ज्यामध्ये आरुषि पाहायला मिळणार आहे, तो युद्धावर आधारित चित्रपट असेल.

या चित्रपटात तप्सी पन्नू, भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar), कीर्ति कुल्हारी यांच्यासह आणखी दोन अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा संरक्षणातील सहा धाडसी महिला अधिकाऱ्यांच्या धैर्यावर आधारित आहे.

चित्रपटाच्या आधी आरुषी एका म्युझिक अल्बममध्येही दिसणार असल्याची माहिती आहे. टी सीरिजसाठी आरुषी रोहित सुचांती समवेत म्युझिक अल्बम शूट केल्याची माहिती तिने स्वतः दिली होती. टी सीरिज लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करणार आहे.

आगामी चित्रपटाविषयी टी सीरिजच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की हा चित्रपट महिलांवर केंद्रित असेल. आतापर्यंत पुरुषांच्या वीरतेवर युद्ध चित्रपट बनले आहेत. महिलांसाठी फक्त एक ‘राजी’ चित्रपट आहे.

‘उरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी पहिली पसंती आहेत आणि त्यांच्यासोबत चर्चाही झाल्याचे बोलले जाते. आदित्य सध्या रॉनी स्क्रूवाला प्रोडक्शनचा चित्रपट ‘अश्वत्थामा’ च्या कामात व्यस्त आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER