राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा हा चित्रपट झाला जपानमध्ये प्रदर्शित

Stree

देशातील प्रेक्षक आणि समीक्षकांची मने जिंकल्यानंतर अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री’ (Stree) हा हॉरर कॉमेडी चित्रपट सोमवारी जपानमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये राजकुमार राव (Rajkumar Rao), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाने फक्त भारतात १२५ कोटी रुपयांची उलाढाल करून आश्चर्यकारक यश मिळवले.

भारत वगळता बर्‍याच देशांच्या सरकारांनी चित्रपटगृह उघडण्यास परवानगी दिली आहे. तथापि, येथेदेखील सिनेमांचे मालक आणि त्यांच्या संघटनांनी सरकारला सतत आग्रह केला आहे की, उर्वरित कामे सुरू करण्याची परवानगी मिळाल्याप्रमाणेच त्यांना चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी द्यावी. अद्याप सरकारकडून कोणतेही ठोस उत्तर आले नाही. चित्रपटांचे कामही जोरात सुरू नाही, म्हणून परदेशात सुरू झालेल्या चित्रपटगृहांमध्ये नवीन चित्रपटांसह जुने सुपरहिट चित्रपटदेखील प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करत आहेत. जपानमध्ये सोमवारी प्रदर्शित झालेल्या या हॉरर कॉमेडी चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान, राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी केली आहे.

वर्ष २०१८ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने देश-विदेशात आधीच दरारा निर्माण केला आहे. चित्रपटाची कहाणी मध्यप्रदेशातील चंदेरी या गावाची आहे, जिथे जादूटोणा आहे. ती रात्रीच्या अंधारात अविवाहित पुरुषांचा बळी घेते. चित्रपटाचे मुख्य कलाकार तिच्या आत्म्यास शांती मिळवण्यासाठी अनेकगोष्टी करतात. दरम्यान, तेथे जोरदार कॉमेडीदेखील होते. केवळ २३ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने देशात सुमारे १२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याच वेळी या चित्रपटाने जगभरात (World Wide ) १८० कोटी रुपयांची कमाई केली. दोन वर्षांनंतर चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित झाल्याने त्याची कमाई आणखी वाढणार आहे. तेथील स्थानिक भाषेची उपशीर्षके (Subtitles) असलेला हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER