जालियनवाला बाग हत्याकांडवर आधारित चित्रपट दहा वर्षानंतर झाला होता प्रदर्शित

Vinod Khanna - Jallianwala Bagh

प्रख्यात गीतकार, लेखक, दिग्दर्शक गुलजार (Gulzar) यांनी अमृतसरमध्ये (Amritsar) इंग्रजांनी केलेल्या नृशंस हत्यांकाडांवर एक कथा लिहिली होती. इतिहासात हे नृशंस हत्याकांड जालियनवाला बाग (Jallianwala Bagh) नावाने ओळखले जाते. यंदाच्या वर्षी इंग्रजांनी हे हत्याकांड चुकीचे झाल्याचे म्हणत माफीही मागितली होती. मात्र 100 वर्षानंतर इंग्रजांना याची जाणीव झाली. जाऊ दे, तो काही आपला आत्ताचा विषय नाही. तर 1977 मध्ये गुलजार यांनी जालियानवाला बाग हत्याकांडावर एक कथा लिहिली आणि त्यावर चित्रपट निर्मिती सुरु झाली. परंतु चित्रपट पूर्ण होऊन प्रदर्शित होण्यास एक दशक लागले. अर्थात याची कारणेही अनेक होती. गुलजार लिखित या चित्रपटाचे दिग्दर्शन सुुरुवातीला हृषिकेश मुखर्जी करीत होते आणि नायक होता परीक्षित साहनी. बलराज साहनी परीक्षित साहनीच्या वडिलांची भूमिका साकारणार होते. चित्रपटाचे बजेट खूप होते. शूटिंग सुरु असतानाच परीक्षित साहनी यांचे निधन झाले. बजेटही वाढल्याने चित्रपट बंद करण्यात आला.

पुन्हा चित्रपट सुरु केला तेव्हा कलाकारांमध्ये बदल करण्यात आला. बलराज साहनीच्या जागी ओम पुरी यांना घेण्यात आले आणि परीक्षित साहनीच्या जागी नायक म्हणून विनोद खन्नाची निवड करण्यात आली. विनोद खन्ना तेव्हा पूर्ण भरात असल्यानेच त्याची निवड केली होती. मात्र विनोद खन्ना नायक झाल्याने त्याला सूट होईल अशा प्रकारे चित्रपटाची कथा बदलण्यात आली. मात्र शूटिंग दरम्यानच विनोद खन्ना (Vinod Khanna) ओशोंच्या आश्रमात गेला. पाच वर्ष तेथे राहिल्यानंतर जेव्हा तो परत आला तेव्हा या चित्रपटाचे शूटिंग पूण करण्यात आले आणि 1987 ला चित्रपट प्रदर्शित झाला. परंतु बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही विशेष करामात करू शकला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER