पित्याला बॉलिवूडची तर पुत्राला बार आणि पबची काळजी; आशिष शेलारांचा टोमणा

Ashish Shelar

पुणे :- महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार सामान्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. त्यांना कोणाशीही काही देणे-घेणे नाही. मुख्यमंत्र्यांना, फक्त बॉलिवूड मुंबईच्या बाहेर जाणार नाही याची काळजी आहे. पुत्राला पब आणि बारची चिंता आहे, असा टोमणा भाजपाचे आ. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मारला.

ते म्हणालेत – बॉलिवूड (Bollywood) मुंबईतून बाहेर जावे, असे आमचे बिलकूल म्हणणे नाही. कोणीही रेस्तराँ आणि बारची वेळ वाढवयाची मागणी केली नव्हती तरी त्यांची वेळ वाढवण्यात आली, या दोनच गोष्टींची काळजी सरकार करते.

पब – बार उघडण्यापूर्वी मंदिरे उघडण्याची मागणी चूक नाही. ते जर नियम घालून उघडले जाऊ शकते तर मंदिरे नियम घालून का नाही उघडली गेली? सरकारने राज्यातील शाळा उघण्याच्या संदर्भात आमच्याशी चर्चा करावी, अशी आमची भूमिका आहे. चर्चा केल्यानंतर भाजपाची काय भूमिका आहे हे आम्ही जाहीर करू, असे शेलार म्हणालेत.

स्थानिक प्रशासनाने कोरोनाची (Corona) परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा हा राज्य सरकारचा निर्णय चांगला आहे. आमची सत्ता असती तर सर्वांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेतला असता. पण हे सरकार असे काही करताना दिसत नाही, असे ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ‘महाराष्ट्रात सरकार आहे कि छळछावणी’? आशिष शेलारांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER