कृषी कायद्यांना स्थगितीचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला, कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम

Farmers Protest - Agriculture Laws

दिल्ली : बुधवारी झालेल्या शेतकरी (Farmers) आणि केंद्र सरकारच्या (Central Government) बैठकीत सरकारने कृषी कायद्यांना (Agriculture Law) एक ते दीड वर्षांसाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवला, तो शेतकऱ्यांनी फेटाळला. कृषी कायदे पूर्णपणे मागे घेण्याच्या मागणीवरच शेतकरी ठाम आहेत.

तीनही कृषी कायदे मागे घ्या आणि एमएसपीची कायदेशीर हमी द्या. या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे संघटनेने म्हटले आहे. २६ जानेवारीच्या ‘ट्रॅक्टर परेड’साठी अजून परवानगी दिलेली नाही. पण शेतकरी दिल्लीच्या आऊटर रिंग रोडवर हा मोर्चा काढण्यावर ठाम आहेत.

२२ तारखेला तोडगा निघेल – तोमर

बुधवारी झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की, तुम्ही थंडीमध्ये एवढ्या त्रासात काम करत आहात, मी विचार केला तुम्हाला थोड हसवतो. आशा आहे की, २२ जानेवारीला शेतकरी आंदोलनावर तोडगा निघेल. कृषी मंत्र्यांच्या चेहऱ्यावरील हास्यामागे कदाचित शेतकऱ्यांसमोर ठेवलेला प्रस्ताव होता. पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी सरकारच्या प्रस्तावावर विचार करण्याचे म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER