शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन निधीला ठेंगा, बेवड्याना सवलत; निलेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

Nilesh Rane & Uddhav Thackeray

मुंबई :- मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने (Thackeray Govt) कोरोनाच्या काळात प्रभावित झालेल्या मद्यविक्रीच्या दुकानांना सवलत देण्याचा निर्णय घेतला. यावरून विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहेत. भाजपाचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) म्हणालेत, सरकारने शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन निधीला ठेंगा दाखवला मात्र, बेवड्याना सवलत दिली!

कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील परवानाधारक (अनुज्ञप्ती) मद्यविक्रीची दुकाने बंद होती. बंद असलेल्या दुकानांच्या परवाना (अनुज्ञप्ती ) शुल्कात सूट देण्याची मागणी होती. त्यानुसार या परवानाधारक मद्यविक्रेत्यांना हे शुल्क भरण्यास सूट देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : …यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिले पाहिजे :  निलेश राणे 

यावर निलेश राणे यांनी ट्विट केले, मद्यविक्रेत्यांना सुट देण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला. लोकहिताचे निर्णय ठाकरे सरकार घेत नाही. नियमित कृषी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन निधी हे सरकार देणार होते. मात्र ते शेतकऱ्यांना अजूनही मिळालेच नाही. पण, बेवड्यांची सोय करण्यामध्ये या सरकारला जास्त इंटरेस्ट आहे!

अन्न पुरवठा, कौशल्य विकास, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एसईबीसी आरक्षणावरही सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER