निदर्शक शेतकरी लाल किल्ल्यात घुसले

The farmers entered the Red Fort

दिल्ली :- दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर मोर्च्यासाठी (Farmers Tractor Rally) पोलिसांनी दिलेला परवानगीचा रस्ता सोडून जबरदस्तीने ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत घुसलेले निदर्शक शेतकरी लाल किल्ल्यावर गेलेत. नंतर काही निदर्शक तिरंगा झेंडा घेऊन लाल किल्ल्यात (Red Fort) घुसलेत.

दरम्यान, ट्रॅक्टर मोर्च्यासाठी परवानगी दिलेला मार्ग सोडून दिल्लीत घुसताना हिंसक झालेल्या या निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांजवळच्या अश्रुधुराच्या नळकांड्या डागणाऱ्या गन हिसकल्या. पोलिसांची वाहने पेटवून दिली. काही बसही जाळल्याची  माहिती आहे.

एका ठिकाणी निदर्शकाने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केला.

ही बातमी पण वाचा : दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन हिंसक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER