चिमणीचे घरटे वाचवण्यासाठी शेतकऱ्याने केला जुगाड

Anand Mahindra

मुंबई :- प्रसिद्ध उद्योगपती, महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांना आवडलेला व्हिडीओ किंवा पोस्ट ते सोशल मीडियावर शेअर करून चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देतात. यावेळी त्यांनी एका शेतकऱ्याच्या संवेदनशीलतेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या शेतकऱ्याने त्याच्या शेतातील चिमणीचे घरटे वाचवण्यासाठी जुगाड केला.

हा व्हिडीओ तामिळनाडूच्या कुंभकोणमजवळील तंजावूर या गावामधील जे. रंगनाथन (४०) या शेतकऱ्याचा आहे. रंगनाथन याच्या शेतामध्ये पिकाची कापणी सुरू होती. रंगनाथनला पिकात चिमणीचे घरटे दिसले, त्यात चार अंडी होती. त्याने कापणी करणारे मशीन थांबवले. ज्या धांड्यांवर चिमणीचे घरटे होते ते व त्याच्या आजूबाजूचे धांडे सोडून पिकाची कापणी केली. धांड्यांना कडींचा आधार देऊन घरटे खाली पडणार नाही, अशी व्यवस्था केली. आनंद महिंद्रा यांनी लिहिले – ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की आपण सर्वांनी या ग्रहावरील आणि आपल्या सहवासातील लोकांशी कसे वागावे.

महिंद्रा यांच्या व्हिडीओला प्रतिसाद देत काही युजर्सनी पक्षी आणि प्राण्यांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो याबाबत कल्पना सुचवल्या आहेत. काही युजर्सनी आपला देश आणि पर्यावरणाचे खरे नायक शेतकरी आहेत, असे म्हटले आहे. एका युजरनं सांगितलं की, ‘प्रत्येक शेतकरी त्याला आपल्या शेतामध्ये असे काही आढळले तर तो असेच करतो. ही घटना खूप सामान्य आहे. हे मी माझ्या आयुष्यात बरेचदा असे पाहिले आहे. मी माझ्या शेतामध्ये मधमाश्यांसाठी असाच काही भाग सोडला आहे.’


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER