फॅनने आपल्या आवडत्या नायिकेला दिला होता 40 लाखांचा नेकलेस

Kareena Kapoor

बॉलिवुड (Bollywood) कलाकारांवर त्यांचे फॅन्स वेड्यासारखे प्रेम करतात. आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहाण्यास मिळावी म्हणून काहीही करण्यास तयार असतात. एवढेच नव्हे तर विचित्र वस्तूसुद्धा भेट म्हणून देतात. आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक दिसावी म्हणून अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान यांच्या बंगल्यासमोर गर्दी जमत असते हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. याच गर्दीत विविध भेट वस्तू घेऊनही फॅन्स आलेले असतात. फॅन्सनी आणलेल्या भेटवस्तूंची माहिती तुम्हाला दिली तर तुम्ही चकित तर व्हालच आणि या अशा भेटवस्तू कोणी देते का असा प्रश्नही तुमच्या मनात नक्कीच उद्भवल्याशिवाय राहाणार नाही.

Beautiful Kareena Kapoor #Kareena #Kareenakapoor #Kareenakapoorkhan  #bollywood #celebrity #bollywoo… | Celebrity necklace, Indian wedding  jewelry, Bollywood jewelryनायकांपेक्षा नायिकांच्या फॅन्सची संख्या फार मोठी आहे. आपल्या झीरो फिगरसाठी करिना कपूर (Kareena Kapoor Khan) बॉलिवुडमध्ये प्रसिद्ध आहे. करिनाने नुकतीच वयाची चाळीसी गाठली पण ती चाळीशीची वाटतच नाही. तिच्या या झीरो फिगरवरच सैफ अली खान भाळला आणि त्याने तिच्याशी लग्न केले. करिनाचे जगभरात प्रचंड फॅन्स आहेत. यात अनेक उद्योगपतींचाही समावेश एकेकाळी होता. आता तिचे लग्न झाल्याने तिच्या फॅन्सच्या संख्येत घट झाली आहे. मात्र करिनाला तिच्या लग्नापूर्वी एका फॅन्सांने एक खरा हिऱ्यांनी जडलेला नेकलेस भेट म्हणून दिला होता. आणि या नेकलेसची किंमत होती फक्त 40 लाख रुपये.

Priyanka Chopra - Wikipediaप्रियांका चोप्राचेही (Priyanka Chopra Jonas) लग्नापूर्वी खूप फॅन्स होते. फॅशन डिझायनर सौरभ कांतसुद्धा प्रियांकाचा फार मोठा फॅन होता. त्याने प्रियंका चोप्राचे पाच फूट उंचीचे एक पोट्रेट तयार केले आणि प्रियांकाला भेट म्हणून दिले. प्रियांकाला ही भेट खूपच आवडली होती. प्रियांकाने हे बोलून दाखवल्यानंतर सौरभला आपल्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटले होते.

Coronavirus: Aishwarya Rai Bachchan admitted to hospital, say reportsऐश्वर्या रॉयच्या (Aishwarya Rai Bachchan) सौंदर्याचे दिवाने कोट्यावधी आहेत. भारतातच नव्हे तर जगभरात तिचे फॅन्स आहे. त्यामुळे अजूनही रोज तिचे फॅन तिला पत्र पाठवत असतात आणि सोशल मीडियावरही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असतात. ऐश्वर्या रायने जेव्हा अभिषेक बच्चनसोबत (Abhishek Bachchan) लग्न केले तेव्हा श्रीलंकेतील एक फॅन डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याने तर ऐश्वर्यावर केस करण्याचा निर्णयही घेतला होता. नंतर त्याने आपला निर्णय बदलला ही वेगळी गोष्ट.

NCB Summon To Deepika Padukone On Sept 25 'A Ploy To Distract From Farmers  Protest': Twitterati - ODISHA BYTESदीपिका पदुकोणला (Deepika Padukone) तर तिच्या एका फॅनने तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून एक वेबसाइटच तयार करून दिली होती. या वेबसाइटवर दीपिकाची संपूर्ण माहिती आणि फोटो देण्यात आलेले होते.

संपूर्ण जगभरात अमिताभ बच्चन यांचे फॅन्स पसरलेले आहेत. त्यांची एक झलक पाहाण्यासाठी त्यांच्या बंगल्याबाहेर आजही गर्दी होते. अमिताभच्या एका फॅन्साने तर त्यांना जी भेट पाठवली होती ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या फॅनने अमिताभच्या घरी समोश्यांनी भरलेला टेंपो पाठवला होता. अमिताभ ने ही भेट स्वीकारली आणि टेंपोतील सर्व समोसे फॅन्सला वाटून टाकले. अमिताभचे तर मंदिरही बांधण्यात आले होते.

COVID-19 effect: Salman Khan postpones events in US, Canada | Celebrities  News – India TVबॉलीवुड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) च्या फॅन्सांची संख्या गेल्या काही वर्षात प्रचंड वाढलेली आहे. सलमान खानची भेट व्हावी म्हणून त्याच्या एका फॅनने चक्क आमरण उपोषण सुरु केले होते. हो अगदी खरे आहे. राजकोटमध्ये राहाणाऱ्या या फॅन्साचे नाव मौलिक बाबुभाई होते. सलमान खानने त्याला भेट दिली नाही पण असे काही करू नको असा मेसेज मात्र पाठवला होता. सलमानचा मेसेज आल्यानंतर त्याने आपले उपोषण मागे घेतले होते.

Sanjay Dutt hospitalised | Actor Sanjay Dutt admitted to Lilavati Hospital  after complaining of breathlessness, under observation | India Newsसलमानप्रमाणेच संजय दत्त (Sanjay Dutt) उर्फ संजू बाबाच्या एका फॅनने तर संजय दत्तबरोबर बाईक राईडची इच्छा व्यक्त केली आणि संजय दत्तने ती पूर्णही केली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्तने भूमि चित्रपटाचे शूटिंग सुरु केले होते. जेथे शूटिंग सुरु होते तेथे त्याचा फॅन आपली कस्टमाइज्ड बाइक घेऊन तेथे पोहोचला आणि संजय दत्तला बाईक दाखवून राईडची इच्छा व्यक्त केली. संजय दत्तनेही त्याच्या इच्छेचा मान राखत बाईक राईड केली होती.

याशिवाय अजूनही अनेक किस्से आहेत परंतु स्थानाअभावी ते सगळेच देणे शक्य नाही. त्यामुळे आवरते घेतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER