फॅमिली पोहोचली ‘आपलं घर’मध्ये

Aai Kuthe Kay Karte

प्रेक्षकांसमोर असलेल्या अनेक टीव्ही चॅनल्समधून आपल्याच मालिकेवर लोकांच्या हातातील रिमोटकंट्रोलचं बटन येऊन थांबावं आणि टीआरपी सतत वाढता राहावा असं कोणाला वाटणार नाही! त्यामुळेच मालिकांमधील कलाकार जेव्हा मालिके चा शंभरावा भाग किंवा पाचशेवा भाग पूर्ण होतो तेव्हा त्याचं धुमधडाक्‍यात सेलिब्रेशन करत असतात. सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेली आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) ही मालिकादेखील प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद घेणारी मालिका म्हणून यशस्वी ठरत आहे. या मालिकेचे नुकतेच 250 भाग पूर्ण झाले. अशावेळी अनेकदा मालिकांच्या सेटवर केक कापून सेलिब्रेशन केले जाते पण आई कुठे काय करते या मालिकेतील देशमुख फॅमिलीने हटक्या पद्धतीने सेलिब्रेशन करायचं ठरवलं आणि ऑनस्क्रीन देशमुख फॅमिली पोहोचली ती आपलं घर या अनाथ मुलं आणि निराधार वृद्धांच्या आश्रमात. या ‘आपलं घर’मध्येच आई कुठे काय करते या मालिकेच्या अडीचशे भाग पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

प्रत्येक घरांमध्ये आई नावाचं एक गाव असतं जे सतत गजबजलेलं असतं. अनेक कवितांमधूनदेखील आईची थोरवी गायली गेलेली आहे. कोरोना लॉकडाउन काळामध्ये घराघरातील आई ही व्यक्ती दिवसभर सगळ्यांची काळजी घेत होती. तिला कुठेच कधीच सुट्टी मिळत नाही. तरीदेखील ज्या पूर्णवेळ गृहिणी म्हणून घरी असतात अशा आईना आई कुठे काय करते अशा दृष्टिकोनातून पाहिले जात जात असतं. समाजातील हाच दृष्टिकोन बदलण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी छोट्या पडद्यावर आई कुठे काय करते ही मालिका दाखल झाली. मधुराणी प्रभुलकरने या मालिकेमध्ये आई म्हणजेच अरुंधतीची भूमिका वठवली आहे. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत एखाद्या कुटुंबासाठी झटणारी आई, स्वतःचा विचार न करणारी आई, पण वेळ पडल्यास तितकीच कठोर आणि कणखर बनणारी आई अशी अनेक रूप अरुंधती या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहेत.

दोन दिवसापूर्वीच या मालिकेचा २५० वा भाग प्रसारित झाला आणि सगळ्या टीमला खूप आनंद झाला. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी आपापल्या भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने साकारल्या आहेत. देशमुखफॅमिलीतील प्रत्येक सदस्य हा प्रेक्षकांना त्यांच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तीपैकीच एक वाटतो. शिवाय सहज सुंदर अभिनयामुळेदेखील हे सगळे कलाकार प्रेक्षकांच्या आवडीचे बनले आहेत. त्यामुळे ही मालिका नेहमीच चर्चेत असते. पण गेल्या दोन दिवसांपासून ही मालिका चर्चेत आहे ती या मालिकेचा २५०वा भाग पूर्ण झाल्याच्या आनंदानिमित्त या मालिकेच्या संपूर्ण टीमने आपलं घर या अनाथ मुलांच्या आणि वृद्धांच्या आश्रमात जाऊन हा आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला यामुळे. ही सगळी टीम आपलं घर या आश्रमात दाखल झाली. यामध्ये अभिनेता अनिरुद्धची भूमिका करत असलेला अभिनेता मिलिंद गवळी ,पडद्यावरचा यश म्हणजे अर्थातच अभिषेक देशमुख, अभि फेम निरंजन कुलकर्णी अपूर्वा गोरे तसेच मालिकेतील सर्वांचे लाडके आई अप्पा ही सगळी टीम आपले घर आश्रमात आली.

त्याठिकाणी मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला तो त्या मुलांना या सगळ्या कलाकारांनी भरवला. विशेष म्हणजे या आश्रमातील निराधार वृद्ध ही मालिका पाहतात असल्यामुळे या मालिकेच्या कलाकारांनी दिलेल्या भेटीमुळे हे सगळेच आजी-आजोबा आणि अनाथ मुलं खूप आनंदी झाली. यानिमित्ताने बोलताना अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर म्हणाली ,मनोरंजन हे माध्यम आता केवळ मनोरंजनपुरते सीमित राहिले ले नाही तर त्यामधून नेहमीच एखादा संदेश दिला जात असतो. आमची मालिका ही घराघरांमध्ये वर्षानुवर्ष आईची भूमिका निभावणाऱ्या सगळ्या महिलांना गृहीत धरण्याची मानसिकता बदलण्याचा संदेश देणारी ही मालिका आहे.

आई जे करत असते त्याची तुलना आपण कोणत्याही गोष्टीशी करू करू शकत नाही. सौंदर्य स्पर्धेसाठी जेव्हा प्रश्न विचारला होता की जगात सगळ्यात जास्त पगार द्यायचा झाला तर तो कोणत्या व्यक्तीला दिला गेला पाहिजे त्यावेळेलादेखील या स्पर्धेमध्ये विजेती मानुषीने असं उत्तर दिलं होतं की जगात सगळ्यात जास्त पगार आईला दिला पाहिजे कारण ती जे काही करते त्याला खरंच मोल नसते किंवा त्याची तुलना आपण जगातल्या कुठल्याच कामाशी करू शकत नाही. पण तरीदेखील आज अनेक घरांमध्ये आईला निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही. तिने फक्त स्वयंपाक घरापुरतच मर्यादित राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. ही मानसिकता कुठेतरी बदलण्याची गरज आहे हा संदेश आमच्या मालिकेच्या निमित्ताने आम्ही देत आहोत.

या मालिकेचे २५० भाग यशस्वीरित्या पूर्ण होणे ही आमच्या संदेशाला मिळालेली दाद आहे असं आम्हाला वाटतं. हे सेलिब्रेशन कसं करायचं याबाबत आमच्या टीमची चर्चा सुरू होती तेव्हा असा विचार केला की सेटवर केक कापून आपण कधीही सेलिब्रेशन करू शकतो पण या निमित्ताने आपल्या समाजातल्या विविध कारणांनी वंचित असलेल्या व्यक्तींशी संवाद साधूया आणि म्हणून आम्ही आपलं घर या संस्थेमध्ये गेलो. एक दिवस आम्ही या मुलांबरोबर आजी आजोबांबरोबर रमलो. आमच्या तिथे असण्याने त्यांना जो आनंद झाला तो सेटवर केक कापून झालेल्या आनंदापेक्षा नक्कीच खूप मोठा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER