हाथरसच्या घटनेने देशाला शरमेने मान खाली घालायला लावली ; कॉंग्रेसच्यावतीने आज राज्यभर सत्याग्रह

हाथरस घटना : गांधींना धक्काबुक्कि ; कॉंग्रेसचे दिवस पालटेल

Balasaheb Thorat

नवी दिल्ली :  हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या (Hathras Gang rape) कुटुंबाला न्याय द्या या मागणीसाठी आज काँग्रेसच्यावतीने राज्यभर सत्याग्रह करण्यात येणार आहे. मुंबईत हे आंदोलन होणार आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात या आंदोलनात सहभादी होणार आहेत. तसेच, पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहील, असे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी सांगितले.

राज्यातील काँग्रेसच्या(Congress) सर्व जिल्हा मुख्यालयांत हा सत्याग्रह करण्यात येणार आहे.

हाथरस येथील अमानुष घटनेने संपुर्ण देश संतापला आहे. एका आदिवासा तरुणीवर सामुहीक बलात्कार करून तिला मारले. त्यातच ज्या पद्धतीने योगी सरकार हे प्रकरण हाताळत आहेत त्यावरून विरोधकांनी सरकारच्या धोरणावर संशय व्यक्त केला आहे. त्यातच गांधी परिवारासोबत पोलिसांची वागणूक यामुळेही देशवासी संतापले आहे. एकूणच सध्या भाजपविरोधी वातावरण देशात आहे.

भाजपशासित राज्यात महिला आणि मुली सुरक्षित नाहीत. ‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मूग गिळून गप्प आहेत. काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशातील भाजपच्या अहंकारी सरकारला जाब विचारण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळळून देण्यासाठी राज्यव्यापी सत्याग्रह करणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

तसेच, थोरात म्हणाले, हाथरसच्या घटनेने देशाला शरमेने मान खाली घालायला लावली. पण भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे आणि हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली, अशी टीकाही थोरातांनी केली.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील पोलिसांनी गांधींना जी वागणूक दिली त्यामुळे सर्वच ठिकाणचे कॉंग्रेस नेते पुन्हा जागे झाले आहेत. या प्रकरणाने कॉंग्रेसला पुन्हा ूबारी मिळणार असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत.

ही बातमी पण वाचा : योगी आदित्यनाथ यांचीच नार्को टेस्ट करावी, हाथरस घटनेवरून राष्ट्रवादी आक्रमक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER