आम्ही येणार म्हणणारे फडणवीस सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात आहेत, बाळासाहेब थोरातांचा टोमणा

मुंबई : आम्ही येणार, आम्ही येणार असे फडणवीस नेहमी म्हणतात, पण येत नाहीत; त्यामुळे ते आशाळभूतपणे सत्तेकडे पाहात आहेत, असा टोमणा महसूल मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मारला.

शरद पवार यांनी राहुल गांधींबाबत गांधीवर केलेल्या वक्तव्यावर बाळासाहेब थोरात प्रतिक्रिया देत होते. ते म्हणालेत, शरद पवार हे ज्येष्ठ आहेत मात्र राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यावरही टीका केली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजच पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली होती. कृषी कायद्यांबाबत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांची भूमिका दुटप्पी आहे असे म्हणालेत. त्यावर प्रतिक्रिया देतांना थोरात म्हणाले, महाविकास आघाडीत काहीही धुसफूस, वाद नाहीत. आमचे सरकार पाच वर्षे व त्यापुढेही चालणार आहे.