
मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात सरकारने नव्हे तर भाजपाच्या एका मंत्र्यामुळे खूप त्रास झाला, असे स्पष्टीकरण नेत्रतज्ज्ञ व वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांनी दिले.
वंजारवाडी येथे संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आलेला समाजभूषण पुरस्कार डॉ. लहाने यांना समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी – फडणवीस सरकारने मला खूप त्रास दिला, असे डॉ. लहाने म्हणाले होते असे सर्वत्र प्रसिद्ध झाले होते. यावर डॉ. लहाने म्हणालेत की, भाजपाच्या एका मंत्र्याने मला त्रास दिला असे माझे म्हणणे होते. त्याऐवजी फडणवीस सरकारने त्रास दिल्याचे वृत्त छापून आले.
डॉ. लहाने म्हणालेत, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी मला नेहमी पाठिंबा दिला व सहकार्य केले. तेव्हाचे विरोधी पक्षनेते व आताचे मंत्री धनंजय मुंडे हेही कायम माझ्या पाठीशी उभे होते. फडणवीस सरकारच्या काळात ‘नेत्रदानाचा महायज्ञ’ ही संकल्पना राबविता आली. तसेच नेत्रतज्ज्ञ म्हणून अनेक उपक्रम राबविता आलेट. फडणवीस सरकारच्या सुरुवातीच्या काळात एका मंत्र्यामुळे मला त्रास झाला होता. मात्र तेव्हाही देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन माझ्या पाठीशी उभे होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला