फडणवीस सरकारने सत्तेत असतांना ‘लव्ह जिहाद’ पुकारला

Sanjay Raut - Devendra Fadnavis

मुंबई : तत्कालीन वनमंत्री संजय राठोड(Sanjay Rathod) यांच्यावर आरोप झाले होते. भाजपाने हे प्रकरण लावून धरले. गेल्या महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांचा राजीनामा घेतला. या पाठोपाठ मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह(Parambir Singh) यांच्या आरोपांच्या सीबीआय चौकशीचा आदेश उच्च न्यायालयाने दिला. अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसांत तिसरी विकेट पडेल, असा खळबळजनक दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी केला आहे.

‘आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेता संजय राऊत यांचा रोख ठोक उत्तर’
अनिल देशमुख प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ‘सीबीआय’साठी दरवाजे उघडले. देशमुखांसारखी फुसक्या आरोपांची प्रकरणे देशात अनेक राज्यांत घडतात, पण तेथे सीबीआय पोहोचत नाही. प्रामाणिकपणाची अपेक्षा यापुढे कोणाकडून ठेवायची, हा प्रश्न आहे. आसामातील एका मतदान केंद्रावर ९० मतदारांची नोंद असताना तेथे १७१ मतदान झाले व त्यास कोणी आक्षेप घेतला नाही! हे कसे रोखणार?

महाराष्ट्राचे राजकारण विरोधी पक्षाच्या हातात गेले आहे काय, अशी शंका आता येत आहे. ३६ दिवसांत महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला व आणखी एक मंत्री घरी जातील, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला तो नैतिकतेच्या मुद्दय़ांवर, पण फडणवीस सरकारच्या काळात १४मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही नैतिकतेने सत्तेशी जणू ‘लव्ह जिहाद’ पुकारला होता. प्रिय वाचकहो, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षांचे सरकार चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विरोधी पक्ष सरकारची प्रतिमा बिघडविण्याची एकही संधी सोडत नाही. या सगळय़ा आरोपांना सडेतोड उत्तरे देणे गरजेचे आहे, नाही तर विरोधी पक्षाचा खोटेपणा रोज ऐकून लोकांना एक दिवस खरा वाटेल. सरकारचे चारित्र्य हे शेवटी राज्याचे किंवा देशाचे चारित्र्य असते. मार्टिन ल्यूथर जेव्हा मरण पावले तेव्हा त्यांनी आपल्या मृत्युपत्रात स्वच्छ लिहून ठेवले, ‘रोख रक्कम किंवा कोणत्याही प्रकारच्या नाण्याचा संग्रह केला नाही.’ आज असे एखाद्या नेत्याच्या बाबतीत बोलणे शक्य आहे काय? यक्षाने युधिष्ठराला जे अनेक प्रश्न विचारले त्यात ‘उत्तम सुख म्हणजे काय?’ असा एक प्रश्न विचारला होता आणि मोठय़ा सावधान चित्ताने युधिष्ठराने यक्षाच्या प्रश्नाला जे उत्तर दिले आहे त्यात सुखाची उत्कृष्ट व्याख्या सामावलेली दिसते. युधिष्ठर म्हणतो, ‘संतोषात सारे सुख आहे!’ म्हणजे समाधान महत्त्वाचे, त्यात सुख आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button