फडणवीसांनी अधिकार नसताना कायदा केला; अशोक चव्हाणांचा पलटवार

Ashok Chavan-Devendra Fadnavis

मुंबई :- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मराठा आरक्षणाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. या निर्णयावरून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ‘देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची फसवणूक केली आहे. अधिकार नसताना कायदा केला, विधानसभेचा अपमान केला.’ अशी टीका मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. “आजचा निकाल निराशाजनक आहे. महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे. यासाठी लढा हा सुरूच राहणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काळातच सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते.

मराठा समाजातील इतर नेत्यांची वकिलांची फळी सोबत होती. इंद्रा सहानी आणि १०२ वी घटनादुरुस्ती यावर चर्चा झाली. फडणवीस सरकारने तयार केलेला गायकवाड समितीचा अहवाल आम्ही बहुमताने मंजूर केला होता. फडणवीसांच्या काळात जितक्या बैठका घेतल्या नसतील तितक्या बैठका घेतल्या गेल्या. सर्वांच्या सहकार्याने सुप्रीम कोर्टात भूमिका मांडली. कोर्टात बाजू मांडताना समन्वयाचा अभाव कधीही नव्हता.” असे अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले. एकमताने आम्ही मराठा आरक्षण कायदा पारित करून दिला.

१०२ व्या घटनादुरुस्तीनंतर कायदा करण्याचा राज्यांना अधिकार नाही हे स्पष्ट केले. त्यानंतर फडणवीस यांना अधिकार नसताना कायदा केला, विधानसभेचा अपमान केला. त्यांनी जे आरक्षण दिले ते बेकायदेशीर होते. गायकवाड समितीचा अहवाल भाषांतर करून दिला आहे. यावरून फडणवीस यांनी जनतेची दिशाभूल करू नये, अशी टीका चव्हाण यांनी केली.

ही बातमी पण वाचा : ‘ठाकरे सरकारने केवळ न्यायाची भाषा करू नये’, मराठा आरक्षणावरुन फडणवीसांची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button