हसन मुश्रीफ यांनी कोरोनाचा केला इव्हेन्ट

Hasan Mushrif

कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना १५ दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर ते कोल्हापुरातच (Kolhapur) खासगी दवाखान्यात उपचार घेत होते. रविवारी संध्याकाळी दवाखान्यातून त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर काल सोमवारी कागल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून त्यांच्या  घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मुश्रीफ यांच्यावर यावेळी फुलांचा वर्षाव करण्यात आला.

या मिरवणुकीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. एकाच रंगाचे पोशाख घातलेल्या लहान मुलांनाही यावेळी मिरवणुकीत सहभागी करून घेतले होते. या मिरवणुकीत सोशल डिस्टन्सिंगचा  (Social Distancing) फज्जा उडाला. हसन मुश्रीफ यांच्या मिरवणुकीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओला जल्लोषी गाण्याची जोड कार्यकर्त्यांनी दिली आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात कोरोनाचा (Corona) उद्रेक सुरू आहे. यापूर्वी प्रसारमाध्यमातून मास्क वापरा, सोशल  डिस्टन्सिंगचा  वापर करा, असे सातत्याने आवाहन करणाऱ्या मुश्रीफ यांनी यावेळी मात्र सर्व नियमांना बगल दिली. कोरोना आजाराचा मुश्रीफ यांनी अक्षरश: इव्हेन्ट केल्याची चर्चा कोल्हापुरात सोशल मीडियात  सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER