एका युगाचा अंत; प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची श्रद्धांजली

Pranab Mukharjee & Ramnath Kovind

नवी दिल्ली : ‘माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या निधनाबद्दल ऐकून मन दुखावले. त्यांचा मृत्यूने एका युगाचा अंत झाला आहे. प्रणव मुखर्जी यांचे कुटुंबीय, मित्र आणि सर्व देशवासियांतर्फे मनापासून शोक व्यक्त करतो,’ या शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी प्रणबदा याना श्रद्धांजली अर्पण केली.

माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी (८४) यांचे आज दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात निधन झाले. त्यांचे पुत्र अभिजीत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.

प्रणब मुखर्जी यांच्यावर १० ऑगस्टपासून दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER