… शेवट चांगला तर सर्व चांगल – नितीश कुमार

Nitish Kumar

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Vidhansabha Elections) प्रचारादरात राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी – ही माझी शेवटची निवड्कणूक आहे; शेवट चांगला तर सर्व चांगले, असे म्हणून सर्वांना आश्चर्याचा धक्कादिला. ते गुरुवारी पूर्णिया येथे प्रचारसभेत बोलत होते.

नितीशकुमार म्हणाले, ‘आज निवडणुक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. परवा निवडणूक आहे, ही माझी शेवटची निवडणूक आहे. शेवट चांगला तर सर्वकाही चांगलं. ‘ (अंत भाला तो सब भला)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यातील मतदान शनिवारी होणार आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी १५ जिल्ह्यातील ७८ जागासाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. सर्व राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER