निवडणुकीत अमित शहांमध्ये जास्तच मग्रुरी दिसली; प्रशांत किशोरांची टीका

amit shah - prashant kishor - Maharashtra Today
amit shah - prashant kishor - Maharashtra Today

नवी दिल्ली :- पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना विधानसभा निवडणूक विजयाची हॅटट्रिक केली. भाजपाने २०० जागा जिंकण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, भाजपला १०० जागाही मिळणार नाहीत, असा अंदाज निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी वर्तवला आणि त्यांचा अंदाज नेहमीप्रमाणे अचूक ठरला.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला धक्का दिला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी अस्वस्थ होत्या. त्यांनी मला फोन करून तातडीने येण्यास सांगितले, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले. पश्चिम बंगालची निवडणूक आम्ही मोठ्या फरकाने जिंकू याबद्दल मला विश्वास होता, असे किशोर म्हणाले. अमित शहा (Amit Shah) आणि भाजपचे काय चुकले हेदेखील त्यांनी सांगितले. ‘प्रोपॅगेंडा तुम्हाला निवडणूक जिंकवून देऊ शकत नाही. अमित शहांमध्ये खूप मग्रुरी दिसत होती. ते आकाशात उडत होते. त्यामुळे ते जमिनीपासून दूर गेले. आम्ही विजयी होणार आहोत, असे जाहीर करून ते लढायला आले. पण त्या फक्त पोकळ चर्चा होत्या. बंगालमध्ये अमित शहांनी जातीय लक्ष दिले. मात्र, तरीही भाजपला शंभरी गाठता आली नाही, अशी टीका किशोर यांनी भाजपवर (BJP) केली.

“गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) मंत्रिमंडळातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचा करिश्मा आहे. त्यांच्या हाताशी खूप संसाधने आहेत. संघ आणि पक्षाचे मोठे नेटवर्क आहेत. त्यांच्यामागे सरकार आणि सरकारी यंत्रणादेखील उभ्या आहेत. निवडणूक आयोगचे निर्णयसुद्धा त्यांच्या पथ्यावर पडणारे होते आणि तरीही ते हरले. यावरून अमित शहांच्या नावलौकिकाची, प्रतिष्ठेची कल्पना येईल.” असा टोला त्यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : ‘ममतादीदींच्या विजयाला कमी लेखण्याचा प्रकार म्हणजे क्षुद्रपणा’, पवारांचा भाजपला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button