
मुंबई :- भाजप (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे, असे शेलार म्हणाले .
आमदार आशिष शेलार यांनी ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले, मेट्रोला गिरगावात विरोध केला. मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर एवढंच नव्हे तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉर, प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच करण्यात आला, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. आता मेट्रो कारशेड उभारण्यापेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा निवडून बुलेट ट्रेन होऊच नये, असा डाव महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारकडून आखला जात असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
ही बातमी पण वाचा : सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकायलाच हवा! : उद्धव ठाकरे
मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला जात आहे. हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधकच आहेत, अशी जहरी टीका देखील आशिष शेलार यांनी केली आहे.
दुसरीकडे, विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज्य सरकारचे सल्लागार कोण आहे, हे समजत नाही. जे या राज्यालाही बुडवायला निघाले आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे.
बुलेट ट्रेनच्या कारशेडसाठी सरकार बीकेसीची जागा घेत आहे. बीकेसीची जागा ही प्राईस लँड आहे. त्यामुळं 25 हेक्टर जागेसाठी तो खर्च 25 ते 30 हजार कोटी रुपयांचा खर्च लागेल. तसेच जमिनीखाली डेपो करत असल्याने पाचशे कोटी रुपयांचं काम 5 हजार कोटींवर नेलं जात आहे. त्यामुळं सरकारचं राज्यातील सर्व प्रोजेक्ट बंद करायला निघाली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
मेट्रोला गिरगावात विरोध केला
मग समृद्धी महामार्ग,कोस्टल रोड, वाढवण बंदर एवढेच नव्हे तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉर..प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच!
आता मेट्रो कारशेड उभारण्या पेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा निवडून
बुलेट ट्रेन होऊच नये असा डाव आखला जातोय. 1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 18, 2020
मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे.
वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला!
हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक!!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 18, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला