शिक्षणव्यवस्थेने मुलांच्या हिताकडे संवेदनशील दृष्टीने बघायला हवे : प्रियंका गांधी

Education system -Priyanka Gandhi

नवी दिल्ली :- देशात कोरोनाचे (Corona) संकट अजूनही कायम आहे. दुसऱ्या लाटेचा चांगलाच तडाखा बसला आहे. जुलै-ऑगस्टमध्ये तिसऱ्या लाटेचीदेखील शक्यता वर्तवली आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊनचे कठोर निर्बंधदेखील लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा-कॉलेजेसच्या परीक्षांचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, परीक्षा घेण्यामागचे नेमके कारणच मला कळत नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस प्रियांका गांधींनी (Priyanka Gandhi) म्हटले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

प्रियांका गांधी यांनी ट्विटमध्ये CBSEच्या बारावीच्या परीक्षांबाबत मुद्दा उपस्थित केला आहे. “कोरोनामुळे विद्यार्थी आधीच प्रचंड तणावामध्ये आहेत. या परीक्षा ऐन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये घेतल्या जात आहेत. त्यांची आरोग्य सुरक्षा महत्त्वाची आहे. आपण धडा का घेत नाही आहोत? बंद जागांमध्ये एकत्र येण्यामुळे कोविडचा प्रसार होतो. दुसऱ्या लाटेने मुलांना नव्या विषाणूची लागण लवकर होऊ शकते. विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये बसण्याची अपेक्षा करणे हे संवेदनशील व अन्यायकारक आहे. यातल्या अनेकांच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे. अनेक महिने निर्णय घेणे लांबवल्यानंतर या परीक्षा अशा काळात घेण्यामागचे कारण मला समजत नाही.” असे प्रियंका गांधी म्हणाल्या

तसेच, ट्विट्समध्ये प्रियंका गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दादेखील उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य हे त्यांच्या शारिरीक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे. मात्र, आता शिक्षणव्यवस्थेने मुलांच्या भल्याकडे संवेदनशील दृष्टीने बघायला हवे आणि या समस्या गांभीर्याने लक्षात घ्यावे.”

बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button