ईडी उद्या मलाही नोटीस पाठवेल ; रोहित पवारांचा खोचक टोला

ED - Rohit Pawar

नवी मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) मागे ईडीच्या (ED) चौकशा लागल्या आहेत. या मुद्द्याला घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी खोचक भाष्य केलं आहे.

भाजपमधून (BJP) नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse), शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) व त्यांच्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. वेगवेगळ्या प्रकरणाशी संबंधित ईडी या नेत्यांची चौकशी करत आहे. या साऱ्यामागे भाजप असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. रोहित पवार यांनीही आज भाजपला लक्ष्य केलं. ‘ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे. उद्या कदाचित मलाही नोटीस येईल,’ असं ते म्हणाले.

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटला रोहित पवार यांनी आज सकाळी पाच वाजता भेट दिली. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीदरम्यान रोहित यांनी मार्केटमधील व्यापारी व माथाडी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते. ‘शेतकरी वर्गाच्या संरक्षणासाठी एपीएमसी मार्केटची गरज आहे. केंद्र सरकारनं राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे. शेतकरी कायदे व शेतकरी आंदोलनाबाबत भाजपची भूमिका हुकूमशाहीची आहे. पण राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल,’ अशी ग्वाही रोहित पवार यांनी यावेळी दिली.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांच्या कार्यपद्धतीचा रोहित पवारांकडून फॉलो, पहाटे चार वाजता एपीएमसीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER