द्राक्ष बागायतदारांची आर्थिक कसरत

Grapes

सांगली : सांगली जिल्ह्यातून दरवर्षी १५ ते १७ लाख टनांपेक्षा  जास्त द्राक्ष उत्पन्न आहे. यातील ४० टक्के द्राक्षाचा बेदाणा होतो. १५ टक्के द्राक्षे निर्यात होतात. द्राक्ष शेतीमुळे पाच लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. मात्र, हीच शेती सध्या अडचणीत आहे. आर्थिक कसरत सुरू आहे.

कोरोनाचा आर्थिक फटका बसल्याने पीक कर्ज भागले नाही. नवीन कर्ज मिळत नाही. खते व औषधे उधारीवर मिळत नाहीत. त्यामुळे या वर्षी द्राक्ष बागायतदारांची आर्थिक कसरत सुरू आहे. गेल्या हंगामात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना बसला. या वर्षीही द्राक्षवेलीवर अपेक्षित घड नसल्याने आणि पीक छाटणी एकाच वेळी झाल्याने द्राक्ष बागायतदार आणखी अडचणीत येण्याची भीती आहे. तसेच या हंगामावर अवलंबून असणाऱ्या लोकांचाही रोजगार अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.

गेल्या हंगामात मार्चमध्ये द्राक्षे बाजारपेठेत पाठविण्याच्या वेळेतच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. लॉकडाऊनमुळे द्राक्षाला बाजारपेठ उपलब्ध नव्हती. व्यापारी, दलाल फिरकले नाहीत. तर, काहींना कवडीमोल दरात द्राक्ष खरेदी केली. यामध्ये द्राक्ष बागायतदार आर्थिक अडचणीत आला आहे. द्राक्षाचा उत्पादन खर्चही भागला नाही. कर्जे थकबाकीत गेली. तरीही न थांबता एप्रिल छाटणी घेतली. मात्र, कोरोनाबरोबरच पावसाने पाठ सोडली नाही.

अगोदरच बाजारपेठ न मिळाल्याने द्राक्षे जास्त दिवस वेलीवर राहिली. पीक छाटणी वेळेत नाही. त्यामुळे काडीची गर्भधारणा व्यवस्थित न झाल्याने ५० टक्के द्राक्षघड कमी आहेत. सुपर सोनाक्का, एस. एस. जातीच्या द्राक्षाला फटका बसला आहे. तरीही लहरी निसर्गाला तोंड देत आहे. ती द्राक्षे दर्जेदार करण्यासाठी द्राक्ष बागायतदारांची धडपड सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER