दारूडी बायको मारते; नवऱ्याने मागितले संरक्षण !

Wife Hits Husband

मणिनगर : बायको दारू पिऊन मारहाण करते, अशी तक्रार करून एका तरुणाने पोलिसांकडे संरक्षण मागितले आहे. घटना अहमदाबादजवळील मणिनगर येथील आहे.याबाबत पीडित रवी या युवकाने खोकरा पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार केली आहे.

रवी (२९) याचा मार्च २०१८ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यावेळी पत्नी (२५) दारुच्या पिते हे रवीला माहित नव्हते. लग्नानंतर बायको दारु पिऊन सतत घरात गोंधळ करायची. तिचे दारुचे व्यसन सुटावे म्हणून रवीने अनेक प्रयत्न केले. मात्र, पत्नी त्याला साथ देत नव्हती. दिवसेंदिवस तिचे व्यसन वाढत गेले. नशेत ती सासू-साऱ्यालाही मारहाण करून शिव्या द्यायची. रवी आई-वडिलांपासून वेगळा रहायला लागला.

त्याच्या आई वडिलांना जूनमध्ये कोरोना झाला. त्यामुळे तो घरी परत लाला. पत्नीही त्याच्यापाठोपाठ तिथे आली आणि वरच्या माळ्यावर राहू लागली. तिचे दारू पिऊन गोंधळ घालणे सुरुच होते. काही दिवसांपूर्वी दारुच्या नशेत रवीच्या ऑफिसमध्ये गेली होती. त्याला ऑफिसबाहेर बोलवून तिथेही धिंगाणा केला, असे रवीने तक्रारीत म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER