‘कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो, लक्षात असू दे’; भातखळकरांचा महापौरांवर पलटवार

Kishori Pednekar - Atul Bhatkhalkar - MAharashtra Today

मुंबई :- मालाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवरून भाजपने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. तसेच महापौर किशोरी पेडणेकरांनीही (Kishori Pednekar) भाजप नेत्यांवर खोचक टीका केली. त्यांच्या टीकेला आता भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. ‘कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो.’ अशा शब्दात भातखळकर त्यांच्यावर पलटवार केला आहे.

मालाड येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला तर ७ जण जखमी आहेत. या संदर्भात माहिती देण्यासाठी महापौरांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप भौ भौ काय करायचे, ते त्यांना करत राहू दे. कारण शिवसेना (Shivsena) हे करते ते करते असे ते सांगत आहेत. हे अगदी दूध के धुले आहेत नो प्रॉब्लेम, असा चिमटा महापौरांनी काढला.

भातखळकरांचे प्रत्युत्तर

महापौरांनी केलेल्या टीकेला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. “मा. महापौर किशोरी पेडणेकर यांचे हे वक्तव्य त्यांचे संस्कार आणि पक्षाची संस्कृती दाखवणारे आहे. महत्त्वाचे म्हणजे कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो हे लक्षात असू दे.” असा पलटवार भातखळकर यांनी केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button