‘रामशास्त्री’ या चित्रपटाचे दस्तावेज तब्बल 76 वर्षांनी सापडले

Ramshastri

पुणे : ‘रामशास्त्री’ (Ramshastri) या चित्रपटाशी संबंधित दुर्मीळ दस्तावेज तब्बल 76 वर्षांनी सापडले आहेत. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) आवारातील प्रभात स्टुडिओमध्ये बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनने ‘रामशास्त्री’ चित्रपटाला दिलेले 1944 चा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट’ हे प्रशस्तिपत्र मिळाले आहे. हे प्रशस्तिपत्र आता प्रभात चित्रपट संग्रहालयात ठेवले जाणार आहे.

प्रभात स्टुडिओमध्ये फारसा वावर नसलेल्या भागात साफसफाईचे काम सुरू असताना कला दिग्दर्शन आणि निर्मिती आरेखन विभागातील सहायक प्राध्यापक आशुतोष कविश्वर यांना हे प्रमाणपत्र सापडले आहे. प्रभात फिल्म कंपनी तर्फे 30 जून 1944 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘रामशास्त्री’ या सिनेमाने इतिहास रचला. त्याकाळी जीवनविषयक मांडणी करणारे चित्रपट प्रदर्शित होत नसत. बंगाल फिल्म जर्नलिस्ट एसोसिएशन, कोलकाता या संस्थेने 1944 मध्ये चित्रपट, हिंदी चित्रपट, पटकथा लेखन, संवाद लेखन, लेखक, दिग्दर्शन, अभिनेता आणि सहायक अभिनेता अशा सात विभागांच्या सर्वोत्कृष्ट पुरस्कारांसाठी चित्रपटाला नामांकन दिले. चित्रपटात सर्व पुरस्कार पटकावले. या चित्रपटातील गजानन जहागीरदार यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER