सरकारमधील तिघांच्या वादामुळे मराठा आरक्षणाचे मातेरे झाले; चंद्रकांतदादांचा आरोप

Chandrakant Patil-Maratha Reservation

कोल्हापूर :- मराठा समाजावर (Maratha Community) महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aaghadi Government) अन्याय केला. ९ सप्टेंबरपासून आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने भूमिका घेतली नाही. शिवसेना (ShivSena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तिघांमधील वादामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचे मातेरे झाले, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांनी केला.

SEBC प्रवर्गाच्या बाबतीतदेखील मराठा समाजाची निराशा केली. राज्य सरकारने १० टक्के आरक्षण द्यायला पाहिजे होते, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारनं मराठा समाजाला गृहीत धरले आहे. त्यामुळे मराठा समाजात मोठा आक्रोश निर्माण होईल. मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी मान्य केले तर या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा करेल. राज्य सरकारला आम्ही सळो की पळो करून सोडू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. मात्र, मराठा समाजाने आंदोलन केले तरच भाजपा नेतृत्व करणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER