…ही सत्ता गेल्याची अस्वस्थता; शरद पवारांचा फडणवीसांना टोमणा

Sharad Pawar - Devendra Fadnavis

मुंबई :- हे सरकार बेइमानीने आले आहे, या फडणवीसांच्या टीकेवर शरद पवारांनी (Sharad Pawar) टोमणा मारला – सत्ता गेल्यानंतर त्रास होत असतो. ते मी समजू शकतो. त्या त्रासाच्या, उद्वेगाच्या पोटी लोक असे शब्द वापरत असतील. ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांची सत्ता गेली त्याची ही अस्वस्थता आहे.

मुंबईत राष्ट्रवादीच्या मुख्यालयात भाजपाचे नेते जयसिंग गायकवाड यांचा पक्षप्रवेश झाला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार यांनी भाजपचे नेते रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर सडकून टीका केली. ‘हे सरकार बेइमानीने आले आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, असा सवाल विचारला असता पवार म्हणाले की, ‘सत्ता गेल्यानंतर त्रास होत असतो. ते मी समजू शकतो.

त्या त्रासाच्या, उद्वेगाच्या पोटी लोक असे  शब्द वापरत असतील. त्याचे इतके गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांची सत्ता गेली ही अस्वस्थता आहे.’ दोन महिन्यांत  महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळेल, असे भाकीत रावसाहेब दानवे यांनी केले होते. यावर शरद पवार म्हणाले – रावसाहेब दानवे (Rao Saheb Danve) यांनी विधिमंडळात अनेक वर्षे काम केले आहे. त्यांना आम्ही काम करताना पाहिले आहे. त्यांचा हा गुण मला माहीत नव्हता.

खेड्यापाड्यातून आलेला नेता म्हणून मी त्यांच्याकडे पाहात होतो. त्यांची ज्योतिष अभ्यासाची तयारी मला माहिती नव्हती. ज्योतिषशास्त्राचा जाणकार म्हणून त्यांचा परिचय नव्हता, तो आता झाला आहे. सामन्य माणसं सोबत असतील तर  कुडमुड्या ज्योतिष्याचे काही चालत नाही.

ही बातमी पण वाचा : केंद्राकडून सत्तेचा गैरवापर, आघाडीच्या लोकप्रतिनिधींना त्रास देण्याचा प्रयत्न – शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER