द डिसायपलचा जगात भारी प्रवास 

The Disciple 2020 Film

तब्बल वीस वर्षा नंतर ” व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल ” मध्ये एक मराठी चित्रपट दाखवण्यात आला. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे  (Chaitanya Tamhane) चा ” द डिसिपल ” (The Disciple) हा मराठी चित्रपट ” व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल ” मध्ये दाखवण्यात आला आहे. मराठी चित्रपटसृष्टी साठी नक्कीच ही अभिमानास्पद बाब आहे. या चित्रपटाला व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल मध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार देखील मिळाला आहे. अनेक दिगग्ज फिल्म फेस्टिव्हल प्रमाणे हा चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटाला पुरस्कार मिळणं हे नक्कीच अभिमानास्पद आहे.

जागतिक चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट दिग्दर्शकांनी नेहमीच उत्तम कामगिरी केली आहे. अनेक जागतिक चित्रपट महोत्सवात मराठी कलाकार, तंत्रज्ञ यांचा गौरव झाला आहे. ‘कोर्ट’ या आपल्या पहिल्याच दिग्दर्शनातून जागतिक सिनेविश्वाला स्वतःची दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या चैतन्यनं यावेळीही अभिमानास्पद कामगिरी करुन दाखवली आहे. चैतन्यनं दिग्दर्शित केलेल्या ‘द डिसिपल ‘ ‘ हा चित्रपट ७७व्या व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात दाखवण्यात आला.

मराठी चित्रपटानं भारतीय सिनेविश्वात खोवलेला हा मानाचा तुरा असून, ‘द डिसिपल’ हा चित्रपट भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. याचं कथानक मुंबईत घडतं. या चित्रपटामध्ये भारतीय शास्त्रीय गायक आदित्य मोडकप्रमुख भूमिकेत असून, तबलावादक अनीश प्रधान यांची संगीत रचना सिनेमाला लाभली आहे. नरेन चंदावकर यांनी संगीत तयार करून ते प्री-मिक्स केलं आहे. या चित्रपटाविषयी सांगताना चैतन्य सांगतो..

” हा क्षण माझ्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी महत्त्वाचा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीकडून आपल्याला शास्त्रीय संगीताचं खूप मोलाचं देणं लाभलं आहे. हा चित्रपट एका शिष्याची अनोखी सांगीतिक गोष्ट सांगतो. माझा हा चित्रपट म्हणजे गेल्या चार वर्षांची मेहनत आहे. अतोनात प्रेम आणि कष्टानं आम्ही हा चित्रपट तयार केला असून, आता कुठे कष्टांचं चीज झाल्यासारखं वाटत आहे”

चैतन्यच सगळ्याच स्तरातून कौतुक होत आहे. एका मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटाची निवड होऊन त्याला पुरस्कार देखील मिळतो ही बाब कौतुकाची आहे. अनेक बड्या दिग्दर्शक , लेखकांनी , काळकरांनी चैतन्यच सोशल मीडियावर कौतुक केलं आहे. लेखक , दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन सांगतो ” मराठी सिने रसिकांसाठी आनंदाची बातमी!! चैतन्य ताम्हाणेला The Disciple साठी आंतरराष्टीय व्हेनिस फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार!!

मराठी मधल्या आशय आणि विषयाच्या नावीन्यतेचा, कौशल्यपूर्ण मांडणीचा डंका असाच जगभर वाजत राहो!!

२०१५ साली चैतन्य ने कोर्ट सारख्या दर्जेदार चित्रपटाचं दिग्दर्शन केल आणि या चित्रपटाची ऑस्कर साठी निवड झाली होती. त्याचा कोर्ट या चित्रपटा नंतर तो कोणता नवीन चित्रपट करणार याकडे सगळ्यांच लक्ष लागून होत आणि मग चैतन्य ने अजून एका नवीन चित्रपट बनवला आणि तो म्हणजे ” द डिसिपल ” या चित्रपटाला पुरस्कार देखील मिळाला.

नेहमीच काहीतरी वेगळं करण्याकडे चैतन्यचा कल असतो आणि म्हणूनच नेहमी विषयावर आधारित उत्तम कमी करून चैतन्य वेगळ्या थाटणीच काम करतो आणि आपली एक वेगळीच ओळख संपादन करतो. चैतन्य साठी नक्कीच ही बाब खूप मोलाची आहे पण मराठी चित्रपट सृष्टी साठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आणि अभिमानाची आहे.

” कोर्ट ” या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आणि आता चैतन्य नव्या चित्रपटाचं एवढं भरभरून कौतुक होतंय. जगभरात या चित्रपटाची चर्चा आहे आणि आता या चित्रपटाला बहुमान मिळत एवढा मनाचा पुरस्कार देखील मिळाला. द डिसिपल या सिनेमा ने अटकेपार झेंडा रोवून खूप कमालीचं काम केलं आहे. या चित्रपटाचं कौतुक होतंय पण त्याच सोबतीने एका तरुण दिग्दर्शकाने हा चित्रपट तयार केला आहे ही बाब उल्लेखनीय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER