एमआयएम नावाच्या घाणीचा बंदोबस्त आत्ताच झाला पाहिजे, निलेश राणे यांचा हल्लाबोल

Nilesh Rane & Owasi

सिंधुदुर्ग : भारतात अवैधरित्या घुसलेल्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या लोकांकडे महाराष्ट्रातील एमआयएम व काँग्रेसच्या एका आमदारासह एकूण सात आमदारांची स्वाक्षरी असलेली लेटरहेड सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, हा प्रकार धक्कादायक असून देशविघातक कृत्यासाठी या आमदारांना २४ तासांच्या आत अटक करावी, ही बातमी शेयर करत भाजप नेते माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एमआयएम पक्षावर तोफ डागली आहे. राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातूनहल्लाबोल केला आहे. ‘तो बिन कवडीचा ओवेसी आणि त्याच्या पक्षाला भारतामध्ये बंदीच घातली पाहिजे. जो ‘भारत माता की जय’ म्हणत नाही अशा लोकांना भारतात राहण्याचा अधिकार नाही. एमआयएम नावाच्या घाणीचा बंदोबस्त आत्ताच झाला पाहिजे’. असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER