या दिग्दर्शकाने पृथ्वी थिएटरच्या कँटीनमध्ये काम करून केली करिअरला सुरुवात

Anurag Kashyap

26-27 वर्षांपूर्वी दिल्लीहून एक तरुण पाच हजार रुपये खिशात घेऊन मुंबईला नशिब आजमावण्यासाठी आला. येथे तसे त्याच्या ओळखीचे कोणी नव्हते. मात्र चित्रपट क्षेत्रात लेखक, दिग्दर्शक म्हणून काम करायचे स्वप्न त्याने पाहिले होते आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले होते. संघर्ष करताना पैसे संपले आणि त्याला चक्क रस्त्यावरही झोपण्याची वेळ आली. पण त्याने हार मानली नाही.

याच दरम्यान त्याला पृथ्वी थिएटरच्या कँटीनमध्ये पडेल ते काम करण्याची नोकरी मिळाली. कँटीनमध्ये काम करता करता त्याने फावल्या वेळात संवाद लिहिण्याचे काम केले आणि यातूनच काही लेखक आणि दिग्दर्शकांबरोबर त्याची ओळख झाली. या ओळखीमुळेच त्याला पहिला चित्रपट लिहिण्याची संधी दिली राम गोपाल वर्मा यांनी. हा चित्रपट होता सत्या. सौरभ शुक्लाबरोबर त्याने या चित्रपटाची कथा लिहिली आणि त्याच्यासाठी चित्रपटसृष्टीचे दरवाजे उघडले.

त्यानंतर त्याने अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि काही चित्रपटांची निर्मितीही केली. हा तरुण आहे अनुराग कश्यप (Anurag Kashyap). पांच. ब्लॅक फ्रायडे, देव डी, गुलाल, गँग्स ऑफ वासेपुर, बॉम्बे टॉकीज, अगली, रामन राघव 2.0, मनमर्जिया हे त्याचे गाजलेले चित्रपट. आज त्याचा वाढदिवस आहे महाराष्ट्र टुडेतर्फे त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER