दिग्दर्शकाने प्रियांकाला सांगितले होते गाण्यात अंडरगारमेंट्स दिसले पाहिजेत

Priyanka Chopra

बॉलिवूडमध्ये (Bollywood) निर्माते-दिग्दर्शक नायिकांकडून भरपूर अंग प्रदर्शन करवून घेतात यात नवी गोष्ट नाही. बॉलिवूडला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीचा काही काळ सोडला तर नंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने नायिकांच्या शरीराचे दर्शन घडवण्याच्या प्रकारात प्रचंड वाढ झाली होती आणि आजही ती कायम आहे. नायिकेच्या अंग प्रदर्शनासाठी सगळ्यात सोपे कारण म्हणजे तिला पावसात भिजवणे किंवा स्वीमिंग पूलमध्ये आंघोळ करायला लावणे. त्यामुळेच अनेक सिनेमात पावसातील गाणी दिसली आहेत आणि अजूनही दिसत आहेत. आज याची आठवण झाली ती प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) सांगितलेल्या एका घटनेमुळे.

प्रियांका चोप्राचे आत्मचरित्र ‘अनफिनिश्ड’ नुकतेच प्रकाशिच झाले असून या पुस्तकाला तिच्या फॅन्सने हातोहात घेतले आहे. या पुस्तकात प्रियांकाने बॉलिवूडमध्ये तिला आलेले अनुभव खुलेपणाने मांडलेले आहेत. यात अगदी तिला अंग प्रदर्शन करण्यासाठी कसे बाध्य करण्यात आले त्या घटनांची माहितीही दिली आहे. अशीच एक घटना प्रियांकाने पुस्तकात नमूद केली असून या घटनेसाठी अखेर सलमान खानला हस्तक्षेप करावा लागला होता असेही म्हटले आहे. मात्र प्रियांकाने दिग्दर्शकाचे किंवा सिनेमाचे नाव मात्र उघड केलेले नाही.

या घटनेबाबत माहिती देताना प्रियांकाना लिहिले आहे, एका सिनेमात माझ्यावर एक अत्यंत सेक्सी, सेडिक्टिव्ह गाणे शूट केले जाणार होते. या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी मला माझ्या अंगावरील एक-एक कपडा उतरवायचा होता. गाणे खूप मोठे होते. त्यामुळे प्रियांकाने दोन लेयरमध्ये कपडे घालू का असे दिग्दर्शकाला विचारले. दोन लेयर कपडे असतील तर कपडे उतरवायला वेळ लागेल आणि गाणेही पूर्ण करता येईल. तेव्हा दिग्दर्शकाने मला माझ्या स्टायलिस्टशी बोलण्यास सांगितले. मी माझ्या स्टायलिस्टशी बोलले आणि त्याला सिचुएशन सांगून सगळे समजावून सांगितले. त्यानंतर मी फोन दिग्दर्शकाला दिला. दिग्दर्शकाने माझ्या स्टायलिस्टशी बोलताना म्हटले, ‘काहीही कर, पण चड्डी दिसली पाहिजे. नाही तर प्रेक्षक सिनेमा पाहायला कशाला येतील?’

दिग्दर्शकाचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. खरे तर मी ते गाणे करण्यास तयार होते पण दिग्दर्शकाची मानसिकता पाहून, त्याची विचार करण्याची पद्धत पाहून मला खूप राग आला आणि मी तो सिनेमा सोडून दिला. तेव्हा मात्र तो दिग्दर्शक घाबरला आणि सिनेमा करावा म्हणून माझ्या मागे लागला. एकदा मी सलमानसोबत एका सिनेमाचे शूटिंग करीत असताना तो दिग्दर्शक तेथे आला आणि सिनेमा करण्याबाबत बोलू लागला. सलमानने आमचे बोलणे ऐकले. त्याला सगळी गोष्ट सांगितल्यावर सलमानने त्या दिग्दर्शकाला समज दिली असेही प्रियांकाने पुस्तकात लिहिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER