कंगनाच्या कार्यालयाचे तोडकाम तूर्तास थांबवले, सर्वोच्च न्यायालयाकडून कंगनाला दिलासा

Kangana Ranaut - Supreme Court

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेनेतला (Shiv Sena) वाद आता चांगलाच पेटला आहे. मुंबई महापालिकेत (BMC) अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेने आज कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर जेसीबी चालवला. यामुळे कंगना अधिकच संतापली व तिने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला काहीसा दिलासा दिला असून कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावरील बीएमसीच्या कारवाईला तूर्तास स्थगिती दिली आहे.

महापालिकेने कालच कंगनाचे पाली येथील कार्यालय हे अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगत कार्यालयाबाहेर नोटीस लावली होती. त्याप्रमाणे चोवीस तासानंतर मनपाने आज सकाळीच कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करण्यास सुरूवात केली.

आपल्या कार्यालयावर जेसीबी चालताच कंगनाने मुंबई उच्चन्यालयात धाव घेतली व उच्च न्यायालयाने ताबडतोब सुनवाणी घेऊन तुर्तास कंगनाला दिलासा दिला आहे. त्यामुळे सुमारे दीड-दोन तास तोडकाम केल्यानंतर महापालिकेने कारवाई थांबवली. तोडकाम करण्यासाठी कार्यालयात गेलेले महापालिकेचे कर्मचारी साहित्य घेऊन बाहेर आले असून जेसीबीही रवाना झाला आहे.

दरम्यान, माझ्या घरात कोणतंही अवैध बांधकाम नाही. तसंच कोरोना (Corona) काळात 30 सप्टेंबरपर्यंत कोणत्याही तोडकामावर सरकारने बंदी घातली आहे. फॅसिझम काहीसं असंच असतं, असं ट्वीट कंगना रणौतने ट्विट करत म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER