संजय राठोडांचे मंत्रिपद मागणाऱ्या ‘त्या’ नेत्याची मागणी वैयक्तिक : बंजारा महंत

Haribhau Rathod - Sanjay Rathod

वाशिम : संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे मंत्रिपद मला द्या, अशी मागणी करणारे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना बंजारा समाजाचा पाठिंबा नसल्याचे संकेत दिसले. या संदर्भात पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज म्हणालेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांना वनमंत्रिपद दिले तर स्वागतच आहे. मात्र, ही समाजाची मागणी नसून त्यांची वैयक्तिक मागणी आहे. शुक्रवारी वाशिममध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हरिभाऊ राठोड यांच्या मंत्रिपदाच्या मागणीबाबत सुनील महाराज यांनी हरिभाऊ राठोड यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला. म्हणालेत, हरिभाऊ यांचे वय आता ७० पेक्षा जास्त आहे; त्यांची तब्येतही बरी नसते. शिवाय त्यांची ही मागणी वैयक्तिक आहे. यातून हरिभाऊ राठोड यांना बंजारा समाजाचा पाठिंबा नसल्याचे संकेत मिळाले.

हरिभाऊ राठोड
शिवसेनेला बंजारा समाजाची गरज आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्याऐवजी मला मंत्री करा. तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. अन्यथा मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद मिळाले असते. त्यामुळे आता वनमंत्रिपद मला द्यावे, अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. हरिभाऊ राठोड यांच्यासह ओबीसी नेत्यांच्या आघाडीने २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिला होता, हे उल्लेखनीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER