‘सारथी’ला घोषित निधी दिला नाही; आंदोलन पुन्हा भडकण्याचे संकेत

Ajit Pawar

पुणे : छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj)संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’चे आंदोलन पुन्हा एकदा भडकण्याचे संकेत दिसत आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मराठा संघटनांनी केला आहे.

सरकारने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘सारथी’साठी (Sarathi) ८० कोटी रुपयांची घोषणा केली होती. पण १८ जानेवारीला फक्त २५ टक्केच निधी मिळाला. एकूण १३० कोटी रुपयांपैकी फक्त ३१ कोटी रुपये मिळाले आहेत.

उद्या (बुधवारी) सकाळी ११ वाजता सारथी संस्थेत संचालक मंडळाची बैठक होणार आहे. तारादूतांच्या नियुक्ती प्रश्नावरही चर्चा होईल. या बैठकीत राज्यभरातून तारादूत हजर राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी सारथी संस्थेबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने आढावा घेतला होता.

आत्मदहनाचा इशारा
बुधवारी होणाऱ्या सारथी संस्थेच्या बैठकीत प्रश्न सुटला नाही तर तारादूत १५ तारखेला तीव्र आंदोलन करणार आहेत. १९ तारखेला आत्मदहन करण्याचा इशारा तारादूतांकडून देण्यात आला आहे. यामुळे सारथीचे आंदोलन पुन्हा पेटण्याचे संकेत दिसत आहेत.

‘महाज्योती’लाही स्वायत्तता द्या – ओबीसी नेते
सारथी संस्थेला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्यात आल्यानंतर आता ओबीसी नेत्यांनी ‘महाज्योती’ संस्थेलाही स्वायत्तता देण्याची मागणी केली आहे. ओबीसी समाजाच्या लोकसंख्येनुसार या संस्थेला निधी मिळावा, अशी मागणीही या नेत्यांनी केली. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या मागणीचे समर्थन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER