धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता ; शरद पवारांची प्रतिक्रिया

Dhananjay Munde-Sharad Pawar

मुंबई :- राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा (Renu Sharma) हिने  मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय निष्कर्षाला येऊ नये, असं मी सुरुवातीलाच म्हटले होते, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. ते कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

‘रेणू शर्मानी केस परत घेतली असल्याचं समजलं. आम्हाला प्रथमदर्शनी सातत्य पडताळण्याची गरज वाटते. याच्या खोलात जाण्याची गरज आहे असं मी आधीच म्हटलं होतं. आमचा निर्णय बरोबर होता असं आता वाटतंय. त्यामुळे आता जे झालं त्यानुसार आमचा निर्णय योग्य होता’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. एकंदरीतच मुंडे यांच्यावरील विश्वास खरा ठरला असंच यावरून म्हणावं लागेल, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असे रेणूने तक्रार मागे घेताना सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER