बहिरा स्वतःच्या तालावर नाचे ; काँग्रेस नेत्याचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

Sanjay Nirupam - Raj Thackeray - Maharastra Today
Sanjay Nirupam - Raj Thackeray - Maharastra Today

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना वाढण्यास स्थलांतरित जबाबदार असल्याचं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

“बहिरा नाचे आपन ताल!” म्हणजे “बहिरी व्यक्ती स्वतःच्याच तालावर नाचते” अशा अर्थाची टीका निरुपम यांनी केली आहे.
मुंबईतील वाढत्या समस्यांना परप्रांतीय जबाबदार असल्याचा दावा राज ठाकरे सुरुवातीपासूनच करत आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परप्रांतीयविरोधी धोरण सर्वश्रुत आहे. गेल्या वर्षी परप्रांतीय मजूर मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर जात असतानाही राज ठाकरेंनी त्यांना परत घेताना मोजणी आणि चाचणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दुसरीकडे, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी परप्रांतीयांविषयी कायम कणव बाळगला आहे. कालच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी पुन्हा परप्रांतीयविरोधी सूर आळवल्याने निरुपम यांनी ट्विटरवरुन राज ठाकरेंना खडेबोल सुनावले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button