
मुंबई : ‘आम्ही येतो, आम्ही येणार; असे म्हणणार्यांचे दिवस आता संपले आहेत. आता ते परत कधी येणार नाहीत. त्यांना सांगा, विधान परिषदेत महाविकास आघाडीचे पूर्ण बहुमत आहे.’ असा टोमणा काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मारला.
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या भारत बंदवरून (Bharat band) एका वृत्तवाहिनीशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “मोदी सरकारने केलेल्या काळ्या कायद्याच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. संपूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. स्वामिनाथन आयोगाचा अहवाल प्रकाश जावडेकरांनी पूर्ण वाचला नाही. या आयोगाच्या अनेक प्रमुख शिफारशी आमच्या सरकारने स्वीकारल्या होत्या. गुजरातमध्ये मोदींनी सांगितले होते की, msp ला धक्का लावला जाणार नाही. पण नव्या कायद्यात msp चा उल्लेख केलेला नाही.
नव्या कृषी कायद्यात शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. किमान हमी भाव मिळाला पाहिजे. हे सरकार भांडवलदारांच्या फायद्यासाठी काम करते आहे. स्वामिनाथन आयोगाच्या ८२ शिफारशी आम्ही स्वीकारल्या आहेत.” असे वडेट्टीवार म्हणाले. त्यानंतर वडेट्टीवार यांनी आपला मोर्चा फडणवीस यांच्याकडे वळवला. ‘आम्ही येतो, आम्ही येणार’ असे म्हणणार्यांचे दिवस आता संपले आहेत. आता परत कधी येणार नाहीत. विधान परिषदेत महाविकास आघाडीचे पूर्ण बहुमत आहे, असे त्यांना सांगा म्हणालेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला