शेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल – राहुल गांधी

Rahul Gandhi

वायनाड :- देशातील सगळ्या शेतकर्‍यांना नव्या कृषी कायद्याबद्दल (Agriculture Law) फार माहिती नाही; ज्या दिवशी सगळ्या शेतकर्‍यांना हा कायदा कळेल तेव्हा सारा देश पेटून उठेल, असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिला. ते केरळमधील त्यांच्या वायनाड मतदारसंघात (Wayanad Constituency) बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले की, हिंदुस्थानच्या शेतकर्‍यांवर हल्ला होतो आहे असे आमच्या लक्षात आले. याची सुरुवात भट्टा पारसौल मध्ये झाली. तिथे शेतकर्‍यांच्या जमिनी लुबाडल्या जात होता. त्यासाठी आम्ही ब्रिटिशांच्या काळातील कायदा काढून टाकला आणि नवीन भूमी अधिग्रहण कायदा आणला. या कायद्यात शेतकर्‍यांना जमिनीचा योग्य मोबदला आणि जमिनीच्या सुरक्षेचे आश्वासन दिले. पण, मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनी हा कायदा मारण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्याविरोधात लढा दिला, त्यांना रोखले. जेव्हा केंद्रीय स्तरावर मोदी अपयशी झाले तेव्हा त्यांनी भाजपा शासित हा कायदा रद्दबातल करण्याचे आदेश दिले असे, राहुल गांधी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER