कोरोनाचा अंधार संपेल; ही वेळ कसोटीची- सिंधूताई सपकाळ

Maharashtra Today

हडपसर :लेकरांनो, तरुणांनो, प्रौढांनो तुम्हाला जगायचे आहे, मरून चालणार नाही. कुटुंबासाठी तुम्हाला जगावेच लागेल. कोरोनाचा अंधार संपणार आहे. ही वेळ कसोटीची आहे आणि ही कसोटी आपण पार करायची आहे. कोरोना (Corona) कोरोना करत बसून चालणार नाही, योग्य काळजी घेतली तर कोरोना आपल्या सावलीलाही थांबणार नाही, असा धीर ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ (Sindhutai Sapkaal) यांनी समाजाला दिला.

सिंधूताई यांनी मगरपट्टासिटीमधील लसीकरण केंद्रावर लसीचा दुसरा डोस घेतला. नगरसेविका हेमलता मगर, माजी उपमहापौर नीलेश मगर उपस्थित होते. सिंधूताई म्हणाल्या,  मास्क लावा, गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा.  ही वेळ म्हणजे आज जगण्याची कसोटीच आहे. संघर्ष करून कोरोनावर विजय मिळवायचा आहे, अशी खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. एकमेकांची काळजी घ्या.

सर्व समाजाला तारेवरची कसरत करायची आहे. उद्याचा दिवस आपलाच आहे. कोरोनाचा धाडसाने, एकत्रितपणे सामना करू, असा विश्‍वास सिंधूताई यांनी व्यक्‍त केला. सिंधूताई यांनी अमरावती जिल्ह्यातील धारणी-मेळघाट तसेच इतरत्र अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी अनाथाश्रम सुरू केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button