‘कालचक्र नेहमी फिरत असतं हे विसरु नये’, आघाडी सरकारबाबत चंद्रकांत पाटील यांचे सूचक विधान

Chandrakant Patil - Maharastra Today
Chandrakant Patil - Maharastra Today

पंढरपूर : संजय राऊत (Sanjay Raut) यांचं कसं आहे, की अमेरिका, इंग्लंड, बेळगांव हे त्यांना माहिती असतं. आम्ही सामान्य माणसं आहोत. संजय राऊत ते कोणालाही सल्ला देऊ शकतात. अमेरिकेच्या, इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देतात, तर ते नितीन गडकरींनाही देऊ शकतात, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला. बेळगावातील मराठी बांधवांना मदत करता येत नसेल तर किमान मराठी मतदारांमध्ये तोडफोड करु नका, असा सल्ला राऊतांनी गडकरींना दिला होता. यावरून चंद्रकांतदादांनी संजय राऊतांना कानपिचक्या दिल्या. ते पंढरपुरात बोलत होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, जयंत पाटील यांचे स्वप्न आहे. अठरा महिने झाले, ते सांगत आहेत की आमच्याकडून गेलेले परत येणार आहेत, परत येणार आहेत. दिवसा स्वप्नं पाहायला कुणाला अडचण नसते. मात्र भाजप पूर्वीपेक्षाही अधिक बलवान होत चाललेली आहे. सामान्य लोकांना माहिती आहे, की कुठल्याही क्षणी सरकार कोसळू शकतं, अशा दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे. दिवा विझण्यापूर्वी जास्त फडफडतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

आम्ही आणि त्यांनी कधीही अहंकार कधी दाखवू नये. कालचक्र नेहमी फिरत असतं. पंधरा वर्ष त्यांचं सरकार होतं, मग आमचं आलं, पुन्हा त्यांचं आलं, पुन्हा आमचं गेलं, त्यांचं आलं, त्यांना नीट माहिती आहे की सरकार कधी पडणार आहे. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढण्याकरता आणि पक्षातून बाहेर पडू नये यासाठी, अशी धडपड त्यांना करावी लागते. आम्ही मात्र सातत्याने सरकारच्या विरोधात संघर्ष करत आहोत. आम्ही वर्षभर पाठी लागल्यावर काल दिलेलं पॅकेजही फुटकं तुटकं दिलेलं आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button