भजनी कलावंतांवर उपासमारीचे संकट ; रोजगाराचा प्रश्न सोडविण्याची मागणी

भजनी कलाकार

अर्जुनी मोरगाव : देशभरासह राज्यात कोरोनाचे (Corona) संकट आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करण्यात आली . ग्रामीण भागातील कलावंतांवर रोजगार नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे साहेब, आमच्या रोजगाराचा प्रश्न शासन स्तरावर सोडवा, अशी मागणी भजनी कलावंताकडून करण्यात आली आहे.

आपल्या परिसराच्या मातीत अनेक कलावंत नावारूपास आले आहे .प्रबोधनाचा वारसा जपण्यासाठी आणि रोजगार मिळावा यासाठी कलाकार काम करत आहेत.

पूर्व विदर्भात खऱ्या जाणिवेने कलावंताची खाण झाडीपट्टीच्या भागात आहे. महाराष्ट्रसह भारताला लावला इतकी ख्याती ग्रामीण |भागाच्या कलावतानी मिळविली आहे . नाटक, जलसा, चित्रपट, दंडार, तमाशा, 4. डहाके, गोंधळ, जादूचे प्रयोग, कीर्तन, कविसंमेलन, नकला, संगीतमय कार्यक्रम आणि भजन सादर केले जात होते, आता या कलाकारांचे प्रामुख्याने सद्याच्या परिस्थितीमध्ये मोठे हाल आहेत. कलावंताची ही हाल-अपेष्टा दूर करण्यासाठी अनेक संघटना स्थापन करण्यात आल्या. मोर्चा काढला पण या हौशी कलावंताची आतापर्यंत कोणीही दखल घेतली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER