काही काळासाठी कोविन ॲप क्रॅश, तर आरोग्य सेतू ॲपवर नोंदणीला सुरुवात

Aarogya Setu - COWIN

नवी दिल्ली : देशात १ मेपासून कोरोनावरील लसीकरणाचा (Coronavirus Vaccination) तिसरा टप्पा सुरू होत आहे. तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वर्षांच्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करण्यास आजपासून सुरुवात झाली. मात्र, एकाच वेळी नोंदणी करणाऱ्यांची गर्दी वाढल्याने कोविन ॲपच्या (COWIN) सर्व्हरला बिघाड आला असून वेबसाईट काही वेळ क्रॅशदेखील झाली होती. काही वेळा ॲप आणि पोर्टलवर मोबाईल नंबर नोंदणी केल्यानंतर ओटीपी येण्यातदेखील अडचण येत होती. तर आरोग्य सेतू (Aarogya Setu) ॲपवर आज ४ वाजतापासून सुरुवात झाली आहे.

नेटकऱ्यांकडून संताप
कोरोना (Corona) साथीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान १८ वर्षांवरील सर्व लोकांना १ मेपासून लस दिली जाणार आहे. लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असून, यासाठी नोंदणी २८ एप्रिल म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. या नव्या यंत्रणेसंदर्भात केंद्र सरकारने नवीन धोरण तयार केले. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील तरुणांना नोंदणी न करता ही लस मिळू शकणार नाही. पीआयबीने सरकारच्यावतीने नोंदणी प्रक्रियेची माहिती दिली. कोरोना लसीसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्वीसारखीच आहे. आपणास लसीसाठी कोव्हिन पोर्टलवर (https://selfregmission.cowin.gov.in/) किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे नोंदणी करावी लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button