आता कोविशिल्ड लस सरकारी रुग्णालयात ४०० तर खाजगी रुग्णालयात ६०० रुपयांना मिळणार

COVISHIELD

मुंबई : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (Serum Institute of India) भारत सरकारनं लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयाचं आपण स्वागत करत असल्याचं ‘कोविशिल्ड’ची (Covishield) निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. नव्या धोरणामुळे लसीकरणाची क्षमता वाढवता येईल तसेच राज्य सरकार, खासगी रुग्णालये आणि लसीकरण केंद्रांना थेट लस देता येईल यासंदर्भात सीरमने समाधान व्यक्त केलं आहे. त्याचसोबत सीरमने खुल्या बाजारात लसीची किंमत किती असेल याचीही माहिती दिली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) भारत सरकारच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीची नवीन किंमत निश्चित केली आहे. एसआयआयने राज्य सरकारच्या रुग्णालयांसाठी ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये प्रतिडोस दराची घोषणा केली आहे. एसआयआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, येत्या दोन महिन्यांत लस उत्पादनाचा वेग वाढेल. आमच्या एकूण उत्पादन क्षमतेच्या ५० टक्के लस भारत सरकार लसीकरण मोहिमेला आणि उर्वरित ५० टक्के राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येईल.

जगातील इतर कोणत्याही लसींच्या किमतींपेक्षा आमची लस स्वस्त आहे, असे कंपनीने म्हटले आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या लसीची किंमत प्रतिडोस १,५०० रुपये आहे, रशियन लसीची किंमत ७५० रुपये आहे आणि चिनी लसीसाठी प्रतिडोस ७५० रुपये मोजावे लागत आहे. सीरम संस्थेने असेही म्हटले आहे की, येत्या चार-पाच महिन्यांनंतर ही लस मेडिकल दुकानांमधूनही खरेदी करता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button