न्यायालयाने संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्टला बजावले समन्स

Alia Bhatt - Sanjay Leela Bhansahli - Maharastra Today

मुंबई :- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी व बहुप्रतिक्षित ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. या चित्रपटाला सातत्याने विरोध होत आहे. आता अभिनेत्री आलिया भट्ट, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) आणि चित्रपटाचे लेखक यांना मुंबईतील माझगाव न्यायालयाने समन्स बजावले आहे.

या सर्वांना मुंबईच्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी २१ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. याचिकाकर्त्यांनी आरोप केला आहे की, ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाद्वारे त्यांच्या कुटुंबाची बदनामी केली जात आहे. गंगूबाई काठियावाडी यांच्या मुलाने ही याचिका दाखल केली आहे. त्यांच्या मुलाचे ‘बाबू रावजी शाह’ असे नाव आहे. गंगूबाई काठियावाडी यांनी दत्तक घेतलेल्या चार मुलांपैकी एक असल्याचा दावा बाबूने केला आहे. तथ्यहीन गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. माझी आणि माझ्या कुटुंबाची या चित्रपटामुळे बदनामी होत असल्याचे त्याने याचिकेत म्हटले आहे.

‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारीत ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट (Movie) आहे. हे पुस्तक हुसैन जैदी यांचे आहे. आलिया भट्टची (Alia Bhatt) या चित्रपटात गंगूबाईची मुख्य भूमिका आहे. तिच्यासोबत या चित्रपटात अजय देवगण आणि विक्रांत मेसी यांचीही मुख्य भूमिका असणार आहे. हा चित्रपट ३० जुलै रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

ही बातमी पण वाचा : पैशांसाठी करिश्माने लग्न केल्याचा माजी पती संजय कपूरचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER