सचिन वाझेंच्या कोठडीतील तपासाची गरज; न्यायालयाने नोंद घेत जामीन नाकारला

Sachin Vaze - Mansukh Hiren - Maharashtra Today

ठाणे : मनसुख हिरेन (Mansukh Hiren) संशयास्पद मृत्युप्रकरणात वादग्रस्त ठरलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या कोठडीतील तपासाची गरज आहे, असे निरीक्षण नोंदवत सत्र न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. यामुळे वाझेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. मनसुख हिरेन यांची पत्नी विमल यांनी आरोप केला आहे की, सचिन वाझे यांनीच माझ्या पतीची हत्या केली. त्यामुळे API सचिन वाझे संशयाच्या भोवऱ्यात फसले आहेत. सचिन वाझे यांनी ठाणे कोर्टात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता, तो ठाणे सत्र न्यायालयाने तात्पुरता फेटाळला आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी १९ मार्चला होईल.

न्यायालयाचे निरीक्षण
जामीन फेटाळताना न्यायालयाने स्पष्ट म्हटले की – त्यांच्याविरुद्ध प्राथमिक पुरावे आहेत, कोठडीतील तपासाची गरज आहे. हा एक अतिशय गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणात, गुन्हेगारी, कटकारस्थान दिसते आहे. प्राथमिकदृष्ट्या हे सर्व अर्जदाराच्या विरोधात आहे. एटीएसनेही कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. म्हणूनच अर्जदार सचिन वाझे यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

मनसुख हिरेन मृत्युप्रकरणाचा तपास
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटके ठेवलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्युप्रकरणाचा तपास ATS करत आहे. शिवाय, केंद्रीय तपास यंत्रणा NIA कडूनही तपास सुरू आहे. सध्या एटीएसच्या तपासाला गती मिळाल्याची दिसते. एटीएसने मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची काल पुन्हा नऊ तास चौकशी केली. मनसुखचे शव मुंब्रा रेतीबंदरहून ठाण्यात आणणाऱ्या ॲम्बुलन्स चालकाचीही काल चौकशी करण्यात आली.

NIA कडून सचिन वाझेंची चौकशी
राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडून सचिन वाझे यांचा जबाब नोंदवला जातो आहे. मनसुख हिरेन मृत्युप्रकरणात पहिल्यांदाच सचिन वाझे यांचे स्टेटमेंट नोंदवले जाते आहे.

सचिन वाझे यांची बदली
सचिन वाझे हे यापूर्वी मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते. मात्र, मनसुख हिरेन प्रकरणामुळे आता त्यांना CFC विभागात टाकून बाजूला केले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख पदावरून हटवल्याची घोषणा केली.

१० तास चौकशी
दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) तब्बल १० तास सचिन वाझे यांची चौकशी केली. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, मी धनंजय गावडेंना ओळखत नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER