पती-पत्नी एकाच वेळी होणार हायकोर्ट न्यायाधीश

Chennai High court

चेन्नई : मुरली शंकर कुप्पुराजू आणि तमिलसेल्वी व्ही. वलायपलयम हे पती-पत्नी असलेले दाम्पत्य मद्रास उच्च न्यायालयात एकाच वेळी न्यायाधीश म्हणून रुजू होणार आहेत. देशाच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने बुधवारी या न्यायालयावर १० नव्या न्यायाधीशांच्या नेमणुकीची शिफारस सरकारला केली. त्यात या दाम्पत्याचा समावेश आहे. औपचारिक नियुक्ती आदेश निघाल्यानंतर त्यांचा शपथविधी होईल.

हे दोघेही गेली १५ वर्षे तमिळनाडूच्या न्यायिक सेवेत आहेत. मुरली तिरुची येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश आहेत तर तमिलसेल्वी उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाच्या न्यायिक प्रबंधक आहेत. दोघेही १९९५ मध्ये न्यायिक सेवेत एकाच वेळी रुजू झाले व त्याच्या पुढच्याच वर्षी दोघांचाही विवाह झाला. आणखी लक्षणीय बाब म्हणजे दंडाधिकारी ते प्रधान जिल्हा न्यायाधीश या पदांपर्यंतच्या बढत्याही दोघांना एकाच वेळी बरोबरीने मिळाल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER