
नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पावरील भाषणाला सुरुवात करतील. कोरोनाने त्राही त्राही झाल्याने लोकांना बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. दोन पैसे मिळावेत आणि झालेल्या नुकसानीची भरपाई व्हावी, ही मुख्य अपेक्षा आहे. याआधी कधीही कुणी पाहिला नाही, असा हा अर्थसंकल्प असेल, असे निर्मला सीतारामन यांनी आधीच स्पष्ट केल्याने उत्सुकता वाढली आहे.
महारोगराईच्या तडाख्यांना सामोरे जात देशाने कोरोना संसर्गाचा प्रखरतेने सामना केला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सोमवारी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना महामारीमुळे संकटात आलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळणार काय? या प्रश्नाचे उत्तर अर्थसंकल्पातून मिळेल, अशी आशा सर्वच प्राधान्य क्षेत्रांकडून व्यक्त होत आहे.
अपडेट्स…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करत आहेत
केंद्रीय अर्थसंकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) संसदेत दाखल
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) संसदेत दाखल
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला